वाडा येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त २२ ते २५ एप्रिल कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन.

वाडा येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त २२ ते २५ एप्रिल कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन.

देवगड.

  तरुण विकास मंडळ, वाडातर (रजि) मुंबई आयोजित श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त सोमवार दि.२२ एप्रिल ते  गुरुवार दि. २५ एप्रिल पर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
  या निमित्ताने  दि.२४ एप्रिल सायं.४ वा.तालुक्यातील महिलांसाठी 'खेळ पैठणीचा 'हा विशेष कार्यक्रम आकर्षण असणार आहे.सोमवार दि.२२ एप्रिल रोजी होम हवन, लघुरुद्राभिषेक, दुपारी १२ वा.स्थानिक भजने, सायं.चार वा. भजन स्पर्धा, रात्री.१० वा.नाडण शाळा नंबर १ व स्थानिक मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, मंगळवार दि.२३ एप्रिल रोजी पहाटे ५ वा. पासून प्रवचन, प्रवचनकार ह.भ. प.श्री. शिरीष कोरगावकर महाराज, (मुंबई), सकाळी ६.१८ वा. श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा, महापूजा व आरती, दर्शन, सकाळी ९ वा.सामूहिक नामजप, दुपारी १२ वा.पासून महाप्रसाद (भंडारा), सायंकाळी ४ वा.श्रींच्या पालखीची भव्य मिरवणूक, रात्री १० वा.समई नृत्य (पावणादेवी समईनृत्य मंडळ किंजवडे).
    बुधवार दिनांक २४ एप्रिल रोजी सायं.४ वाजता महिलांचा हळदीकुंकू समारंभ व रामचंद्र बबन सारंग आयोजित महिलांसाठी  खेळ पैठणीचा भव्य कार्यक्रम (सादरकर्ते दिनेश कोयंडे मुंबई),पैठणी स्पर्धेतील बक्षिसे. पहिला गट विवाहित महिलांसाठी प्रथम विजेता पैठणी साडी आणि सोन्याची नथ, द्वितीय विजेता पैठणी साडी आणि चांदीची नोट, तृतीय विजेता पैठणी साडी आणि चांदीची नोट, चतुर्थ विजेता साडी आणि चांदीची श्रीराम मूर्ती, पाचवी विजेता साडी आणि श्रीराम मूर्ती, अविवाहित मुलींसाठी प्रथम, द्वितीय व तृतीय विजेतांस आकर्षक भेटवस्तू आणि चांदीची श्रीराम मूर्ती, विधवा महिलांसाठी प्रथम द्वितीय व तृतीय विजेतांस साडी व चांदीची श्रीराम मूर्ती, उखाणे फेरीसाठी ८ चांदीच्या नोटी, १२ चांदीच्या श्रीराम मूर्ती अशी बक्षीसे ठेवण्यात आली आहेत.रात्री १० वा. पर्णकेतू पर्णिका पौराणिक दशावतारी नाटक,(श्री देव हेळेकर नाट्य मंडळ कारिवडे सावंतवाडी).गुरुवार दिनांक २५ एप्रिल रोजी सायं. ४ वा. श्री सत्यनारायण महापूजा व आरती,दर्शन, रात्री ८ वा.स्थानिक भजने, रात्री १० वा.डबलबारी भजन बुवा श्री आनंद जोशी व बुवा सागर कणेरी.या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन, तरुण विकास मंडळ वाडातर (राजि)मुंबई त्यांच्याकडून करण्यात आले आहे.