वेंगुर्ले शहरातील २७०/४५ भाजपा बुथ अध्यक्ष पदी निलेश गवस यांची निवड

वेंगुर्ला
संघटन पर्व २०२५ अंतर्गत सावंतवाडी विधानसभेत भाजपच्या वतीने बुथस्तरीय बैठक घेऊन बुथप्रमुख व बुथसमीती गठित करण्यात येत आहेत.त्याचाच एक भाग म्हणुन वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील बुथ क्रमांक ४५ ची बैठक सिद्धीविनायक मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली. यावेळी मा.नगराध्यक्ष राजन गिरप, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळु देसाई व ॲड. सुषमा खानोलकर, शक्तिकेंद्र प्रमुख प्रशांत आपटे, निवडणूक प्रभारी मानवेल फर्नांडिस, मा.उपनगराध्यक्ष अभी वेंगुर्लेकर, मा.नगरसेवीका साक्षी पेडणेकर, ॲड. प्रकाश बोवलेकर, शिवदत्त सावंत मान्यवर म्हणून उपस्थित होते.यावेळी बुथप्रमुख म्हणुन नीलेश रमाकांत गवस यांचे नाव साक्षी पेडणेकर ने सुचवीले व उपस्थित सर्वांनी सर्वानुमते अनुमोदन दिले. यावेळेस शक्तिकेंद्र प्रमुख प्रशांत आपटे यांनी बुथ कमीटी बाबत मार्गदर्शन करुन आपला बुथ सगळ्यात मजबूत असला पाहीजे तसेच पक्षाने दिलेले सर्व कार्यक्रम बुथ वर आयोजित करावे, असे मार्गदर्शन केले.यावेळेस जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी बुथप्रमुख निलेश गवस यांना शुभेच्छा देतानाच बुथ वरील लढाईत आपण जिंकलो पाहिजेत असे आवाहन केले. तसेच आगामी नगरपरिषद निवडणुकीत पून्हा एकदा स्वबळावर वेंगुर्ले नगरपरिषदेमध्ये कमळ फुलवून भाजपा एक नंबरचा पक्ष असल्याचे दाखवुन देऊया, असे आवाहन केले. यावेळेस १ + ११ ची बुथ कमिटी निवडण्यात आली. यावेळी पी.के.कुबल, बबन आरोलकर, संदेश नार्वेकर, सुरी कुडाळकर, उदय महाजन, दिलीप मालवणकर, विवेक राणे, प्रशांत मालवणकर, अमोल सावंत, रविंद्र शिरसाठ, नवनाथ सातार्डेकर, छोटु कुबल इत्यादी उपस्थित होते.