कुडाळ येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

कुडाळ येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

 

कुडाळ


    कुडाळ नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना कुडाळ यांच्याकडून दिनांक 27 मार्च रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सिद्धिविनायक हॉल, कुडाळ येथे सकाळी 10:00 ते दुपारी 01:00 वाजेपर्यंत हे शिबिर असेल. शिबिरादरम्यान सर्वसाधारण तपासणी, स्त्रीरोग, डोळे तपासणी, रक्तदाब, शुगर, रक्तगट तपासणी, बालरोग, कान, नाक, घसा तपासणी, अस्थिव्यंग, बोन डेन्सिटी तपासणी, थायरॉईड तपासणी, दंतशास्त्र, इत्यादी तपासण्यांचा समावेश असेल. त्याचबरोबर कुडाळ शहरातील वयोवृद्ध व अपंग बांधवांसाठी ने-आण करण्याची मोफत सोय देखील करण्यात आली आहे. या शिबिराबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी अमित राणे - 9458155889  गुरु गडकर - 9527262428 यांना संपर्क साधावा. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन शिबिराच्या आयोजकांकडून करण्यात आले आहे.