नागपूर-मडगांव एक्स्प्रेस नियमित, रेल्वे बोर्डाची मंजुरी
नागपूर
नागपूर जंक्शन ते मडगांव (गोवा) दरम्यान धावणाऱ्या ०११३९/४० नागपूर मडगांव विशेष एक्स्प्रेसला नियमित करण्याची मंजुरी रेल्वे बोर्डाकडून देण्यात आली आहे. ही गाडी आता ११२०३/०४ नागपूर मडगांव रेल्वेगाडी म्हणून नियमित दर्जेने धावणार आहे.
या गाडीचे वेळापत्रक असे असेल
- नागपूर जंक्शन ते मडगांव (गोवा): बुधवार आणि शनिवारी दुपारी ०३:०५ वाजता सुटून गुरुवार आणि रविवारी सायंकाळी ०५:४६ वाजता पोहोचेल.
- मडगांव (गोवा) ते नागपूर जंक्शन: गुरुवार आणि रविवारी रात्री ०८:०१ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ०९:४६ वाजता नागपूर जंक्शनला पोहोचेल.
या गाडीचे थांबे असे आहेत
वर्धा जं, पुलगाव, धामणगाव बडनेरा जं, अकोला जं, शेगांव, मलकापूर, भुसावळ जं, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण जं, पनवेल जं, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ, थीवीम (गोवा), करमाळी (गोवा) या गाडीचे संगणकीय आरक्षण www.inquiry.indianrail.gov.in, www.irctc.gov.in व NTES ॲप भारतीय रेल्वेच्या आरक्षण खिडकीवर दि. १६ मे २०२६ पासून सुरु करण्यात येणार आहे.
konkansamwad 
