वेंगुर्ला अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या अध्यक्षपदी शिवराम आरोलकर यांची निवड.

वेंगुर्ला अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या अध्यक्षपदी शिवराम आरोलकर यांची निवड.

वेंगुर्ला.

  वेंगुर्ला अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या अध्यक्षपदी
शिवराम आरोलकर, सीमंतिनी मयेकर यांची वेंगुर्ला तालुका सचिवपदी तर स्मिता गावडे यांची तालुका संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.
   अंधश्रद्धा निर्मूलन हि काळाची गरज असुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावागावांत जादूटोणा, भोंदूबाबा, भानामती या बाबतीत सविस्तर माहिती देऊन अंधश्रद्धा निर्मूलन कायदा बाबतीत जनजागृती होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते व सावंतवाडी जेष्ठ नागरिक संघाचे कोषाध्यक्ष अरुण मेस्त्री यांनी वेंगुर्ला तालुका येथील अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बैठकीत केले.
   यावेळी जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज या विषयावर सविस्तर विवेचन केले तर कार्यक्रमांचे अध्यक्ष तथा अंनिस जिल्हा उपाध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत मार्गदर्शन केले.
   यावेळी व्यासपीठावर जिल्हा समन्वयक विजय चौकेकर, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.संजीव लिंगवत, जिल्हा महिला संघटक रूपाली पाटील, सहसचिव संजय खोटलेकर, जिल्हा सदस्य नामदेव मठकर, जनसेवा प्रतिष्ठान सचिव डॉ.सई लिंगवत, जिल्हा सदस्य सुनील गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.