वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालय येथे ५ ऑक्टोबर रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन.

वेंगुर्ला.
गौड सारस्वत ब्राह्मण समाज, वेंगुर्ला व के.एल.ई.एस.डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटर, नेहरूनगर, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि.५ ऑक्टोबर २०२४ सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंतच्या कालावधीत उपजिल्हा रुग्णालय, वेंगुर्ला येथे मोफत भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
याआरोग्य शिबिरात हृदय रोग, मधुमेह, पोटाचे विकार, हाडांचे विकार, डोळे संबंधी तपासण्या तसेच बीपी, ब्लडशुगर, ईसीजी तपासण्या करण्यात येणार आहेत.तसेच के.एल.ई.एस.हॉस्पिटल बेळगावचे अनुभवी डॉक्टरांकडून तपासणी सल्ला व पुढील उपचारांसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
सदर शिबिरात नाव नोंदणी कलेल्याच पेशंटांची तपासणी करण्यात येणार आहे.त्यामुळे या आरोग्य शिबिराच्या अधिक माहितीसाठी व आगावू नाव नोंदणीसाठी संजय पुनाळेकर 9422434874 व सौ. सुजाता पडवळ 9421268239 यांचेशी संपर्क साधावा. नावनोंदणी केलेल्या रुग्णांनी तपासणीस येताना आपल्या पूर्वीच्या डॉक्टरांनी दिलेल्या औषधांची फाईल सोबत आणावी. या मोफत आरोग्य शिबिराचा व डॉक्टरांच्या मार्गदर्शनाचा लाभ रुग्णांनी बहुसंख्येने घ्यावा.असे आवाहन गौड सारस्वत ब्राह्मण समाज वेंगुर्ला चे अध्यक्ष सौ.सुजाता पडवळ व सचिव संजय पुनाळेकर यांनी केले आहे.