रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज जोरदार पावसाची शक्यता.

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज जोरदार पावसाची शक्यता.

पुणे.

  कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा जिल्ह्यात देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तर विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे.
   पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार पूर्व मध्य बंगालचा उपसागर व लगतच्या भागावर वाऱ्याची एक चक्रीय स्थिती तयार झाली आहे. त्याच्या प्रभावाखाली आज २९ तारखेला उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. तसेच दक्षिण गुजरात ते मध्य केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे आज राज्यातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.
   हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकण गोव्यामध्ये पुढील पाच ते सात दिवस बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी येथे पुढील चार ते पाच दिवस सिंधुदुर्ग येथे पुढील दोन दिवस तर ठाणे येथे आज तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे व सातारा येथील घाट विभागात पुढील चार ते पाच दिवस तर कोल्हापुर येथे आज तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. जळगाव व अहमदनगर येथे उद्यापासून तीन ते चार दिवस मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासहित तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.