देवगड पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांची बदली

देवगड
देवगड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक अरुण भीमराव देवकर यांची पदोन्नती बदली पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज येथे करण्यात आली असून त्यांच्या कार्यमुक्तीचे आदेश सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी दिले आहेत. पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या देवगड पोलीस स्थानकाचा कार्यभार पुढील आदेश होईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात सागरी सुरक्षा शाखा-सिंधुदुर्गचे पोलीस निरीक्षक भरत गोविंद धुमाळ यांच्याकडे देण्यात आला आहे.