परुळे आयोजित राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत कोल्हापूरची ‘असणं नसणं’ प्रथम तर इचलकरंजीची ‘कुपन’ द्वितीय.

वेंगुर्ला.
युवक कला क्रीडा मंडळ परुळे आयोजित स्व. ॲड.अभयकुमार देसाई स्मृती राज्यस्तरीय ३३ एकांकिका स्पर्धेत देशभक्त रत्नाप्पा कुमार कॉलेज कोल्हापूरच्या असणं नसणं या एकांकिकेने प्रथम क्रमांक, रंगभूषा इचलकरंजीच्या कुपन ने द्वितीय तर गायन समाज देवल क्लब कोल्हापूरच्या बिईंग अँड नथिंग ने तृतीय क्रमांक पटकावला दी फोर्थ वॉल थिएटर गोव्याच्या अमर अमृता ला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले तर प्रेक्षक प्रिय एकांकिका म्हणून ढ मंडळी कुडाळच्या ढींग टॅंग ढिटॅंग ची निवड करण्यात आली. परुळे आदिनारायण मंदिराच्या रंगमंचावर संपन्न झालेल्या या ३३ व्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत एकूण ११ संघाने सहभाग घेतला होता. या स्पर्धेला रसिकांनी भरभरून दाद दिली.
स्पर्धेत दिग्दर्शक प्रथम विशाळ चव्हाण (असणं नसणं) देशभक्त रत्नाप्पा कुमार कॉलेज कोल्हापूर द्वितीय अनिरुद्ध दांडेकर (कुपन) रंगभूषा इचलकरंजी तृतीय अनुपम दाभाडे ( बिईंग अँड नथिंग) गायन समाज देवल क्लब कोल्हापूर पुरुष अभिनय प्रथम पियुष जमदार (असणं नसणं) देशभक्त रत्नाप्पा कुमार कॉलेज कोल्हापूर द्वितीय प्रथमेश केरकर (अमर अमृता) द फोर्थ वाल थिएटर डिचोली गोवा तृतीय आकाश सकपाळ (रात बातो की) अक्षर सिंधू साहित्य कला मंच सिंधुदुर्ग स्त्री अभिनय प्रथम कादंबरी माळी (रात बातो की) अक्षर सिंधू साहित्य कला मंच सिंधुदुर्ग तृतीय श्रुती मोहिते (बिईंग अँड नथिंग) गायन समाज देवल क्लब कोल्हापूर श्रद्धा परब (रात बायो की) अक्षर सिंधु साहित्य कला मंच सिंधुदुर्ग प्रकाश योजना प्रथम (अमर अमृता) द फोर्थ वाल थिएटर डिचोली गोवा संगीत संयोजन (बिलिंग ॲड नथिंग) गायन समाज देवल क्लब कोल्हापूर नेपथ्य प्रथम क्रमांक (असणं नसणं) देशभक्त रत्नाप्पा कुमार कॉलेज कोल्हापूर सर्वोत्तम विनोदी भूमिका तेजस मसगे (भूमिका आप्पा) ढिंग टॅंग ढिटॅंग ढ मंडळी कुडाळ ,सर्वोत्तम बालकलाकार साक्षी कातवडेकर (भूमिका छोटी चिनी)- तुती नाट्य शोध रत्नागिरी, समाज प्रबोधन पर एकांकिका (घुसमट) आरती प्रभू कला अकादमी कुडाळ यांची निवड करण्यात आली.