मुंबई-गोवा महामार्गावर दोन कार मध्ये अपघात

कणकवली
कणकवली येथील वागदे पेट्रोल पंप नजीक चालकाचे कार वरील नियंत्रण सुटल्याने दोन कार अपघातग्रस्त झाल्या. काही प्रवासी जखमी होऊन दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले आहे. आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मालवण येथील तांडेल कुटुंबीय टाटा अल्ट्रोज कारमधून मालवणच्या दिशेने जात होते. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजक ओलांडून पलीकडील लेन वर पलटी झाली. याच वेळी मालवण येथील प्रवासी इनोवा कार मधून मुंबई च्या दिशेने जात होते. इनोवा चालकाने प्रसंगावधान राखत गाडी बाहेर वळवली. मात्र त्याचेही गाडीवरील नियंत्रण सुटल्याने इनोवा दुभाजक ओलांडत दुसऱ्या लेन वर जाऊन थांबली. इनोवा मधील प्रवासी सुदैवानेच बचावले तसेच अल्ट्रोज कारचे मोठे नुकसान झाले या कारमधील जखमी प्रवाश्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.