कोकण, मध्य महाराष्ट्रात आज हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा; विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट.
पुणे.
राज्यात गुरुवारी ठाणे, पालघर, विरार आणि कल्याण- डोंबिवली परिसरात जोरदार पाऊस झाला. कल्याण- डोंबिवली येथील २०० ते २५० घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. दरम्यान, आज (शुक्रवार,२१ जून) विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर, कोकण, मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज विदर्भातील अमरावती, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.तर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे तसेच विदर्भातील इतर जिल्ह्यांना हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. नांदेड, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि साताऱ्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.याशिवाय, शनिवारी देखील मध्य महाराष्ट्रात पावसाच जोर कायम राहील,असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात ढगाळ हवामान होत असून हलक्या सरी सुखावून जात आहेत.पावसाची उघडीप असलेल्या भागातील नागरिकांना अजूनही उकाड्याचा सामना करावा लागत आहे.