शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश.
सिंधुदुर्ग.
सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयांतर्गत मुला - मुलींच्या शासकीय वसतिगृहाकरीता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, मालवण, कणकवली व वेंगुर्ला अशा 3 ठिकाणी तसेच मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, मालवण, कणकवली, सावंतवाडी, वेंगुर्ला व देवगड असे 5 ठिकाणी आहेत. या 8 शासकीय वसतिगृहामध्ये विदयार्थी / विद्यार्थीनीना सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेशाची संधी उपलब्ध झालेली आहे.
अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीयसह इतर प्रवर्गाच्या इयत्ता आठवी, अकरावी, व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये रिक्त असणाऱ्या जागेवर विनामूल्य प्रवेश ऑफलाईन पध्दतीने देण्यात येणार आहे. गरजू विद्यार्थ्यांना प्रवेशाबाबतचे अर्ज संबंधित तालुक्याच्या वसतिगृहातील गृहपाल यांच्याकडून प्राप्त करुन आवश्यक कागदपत्रांसह सादर करावेत. शासकीय वसतिगृहात विनामूल्य निवास व भोजनासह शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता, ग्रंथालय, जिम व इंटरनेट वाय-फाय आदी सुविधा विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात येतात. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी तालुक्यास्तरावरील शासकीय वसतिगृहाचे गृहपाल किंवा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांकावर (02362 228882) संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.
शासकीय वसतीगृहात प्रवेश ऑफलाईन (मॅन्युअली) पध्दतीने प्रवेश अर्ज करावयाचा कालावधी पुढीलप्रमाणे वेळापत्रक, शालेय विद्यार्थी 29 जून 2024 पर्यंत. इयत्ता 10 वी व 11 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून ) 31 जुलै 2024 पर्यंत, बी,ए./बी.कॉम/बी.एस.सी.अश्या 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदविका/ पदवी आणि एम.ए/ एम.कॉम/ एम.एस.सी असे पदवी नंतरचे पदव्युत्तर पदवी/ पदविका इ. अभ्यासक्रम. (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून ) 31 जुलै 2024 पर्यंत, व्यावसायिक अभ्यासक्रम, व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रशाकीय वसतिगृह प्रवेशासाठीचे वेळापत्रक स्वतंत्रपणे प्रसिध्द केले जाईल. असे प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.