मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त बांदेश्वर मंदिर येथे अभिषेक सोहळा.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त बांदेश्वर मंदिर येथे अभिषेक सोहळा.

सावंतवाडी.

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 55 वा वाढदिवस सावंतवाडी मनसेच्यावतीने मतिमंद महिलांना नवीन कपडे व खाऊ तसेच भेटवस्तू देऊन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. तसेच बांदेश्वर मंदिर येथे अभिषेक सोहळा देखील करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती मनसेचे तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत यांनी दिली आहे.
   दरम्यान हा वाढदिवस सरचिटणीस संदीप दळवी, गजानन राणे, महेश परब, मिलिंद सावंत व राजू कासकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. तरी तालुक्यातील सर्व मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन  तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत यांनी केले आहे.