उद्या शिवसेना माजी खासदार विनायक राऊत दोडामार्ग दौऱ्यावर.
दोडामार्ग.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार विनायक राऊत यांचा शुक्रवार दि.१४ जून रोजी सकाळी ११.३० वाजता दोडामार्ग तहसीलदार कार्यालय समोरील राष्ट्रवादीचे नेते सुरेश दळवी यांच्या संकुलातील सभागृहात संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी महा विकास आघाडी तील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.
आगामी पदवीधर, विधानसभा निवडणुकीबाबत काय भाष्य करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.