राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सावंतवाडी विधानसभा महिला अध्यक्षपदी नितेशा नाईक यांची नियुक्ती.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सावंतवाडी विधानसभा महिला अध्यक्षपदी नितेशा नाईक यांची नियुक्ती.

सावंतवाडी.

   राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने नितेशा नाईक यांना सावंतवाडी विधानसभा महिला अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्या हस्ते सदर नियुक्तीचे पत्र नितेशा यांना देण्यात आले.यावेळी महिला जिल्हाध्यक्ष रेवती राणे तसेच शहराध्यक्ष ॲड. सायली दुभाषी उपस्थित होत्या. 
              राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी असलेली बांधिलकी आणि सामाजिक,राजकिय क्षेत्रात केलेल्या प्रामाणिक कार्याची दखल घेत नितेशा नाईक यांची निवड करण्यात आली.यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे विचार व कार्य समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचे काम अर्चना घारे-परब यांच्या मार्गदर्शनाखाली जोमाने करेन असा विश्वास नितेशा यांनी दिला तसेच माझे वडील चंद्रकांत नाईक यांनी देखील त्यांच्या राजकीय जीवनप्रवासात काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून निस्वार्थीपणे संघटन वाढीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कायम मेहनत घेतली आणि सामाजिक व राजकीय जबाबदारीचे भान ठेवून काँग्रेसचे प्रामाणिकपणे काम केले अशा भावना देखील नितेशा नाईक यांनी व्यक्त केल्या.सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी पक्ष संघटन व वाढीसाठी तसेच जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी नाईक प्रामाणिकपणे काम करतील असा विश्वास अर्चना घारे-परब यांनी दाखवला व त्यांना शुभेच्छा दिल्या.