युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषद पुरळ विभागात जेष्ठ नागरिकांचा सत्कार.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषद पुरळ विभागात जेष्ठ नागरिकांचा सत्कार.

कणकवली.

   लोकसभा निवडणुकीत जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. मात्र कोणी कितीही प्रयत्न केले तरीही कोकण आणि सिंधुदुर्ग हा शिवसेनेचा गड कायमच राहील. सामाजिक कार्याच्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर जाऊ. पुढील काळात जनता सामाजिक कार्यासोबत राहते की पैशासोबत हे लवकरच स्पष्ट होईल असे शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी सांगितले.महाराष्ट्राचे युवा नेतृत्व युवासेना प्रमुख सन्मानीय आदित्यजी ठाकरे साहेबांच्या जन्म दिनाचे औचित्य साधून आज जिल्हा परिषद पुरळ विभागात गिर्ये गावात युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत जी नाईक यांच्या संकल्पनेतून जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विभागातील बहुसंख्य जेष्ठ शिवसैनिकांनी हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. उपस्थित सर्व जेष्ठ नागरिकांना शाल आणि छत्री देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
   यावेळी बोलताना सतीश सावंत यांनी शिवसैनिक कायमच शिवसेनाप्रमुख हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा घेऊन आमच्या सोबत आहेत. काही ठिकाणी पैसा व सत्तेचा वापर करून मतदारांची दिशाभूल करण्यात आली मात्र हे सातत्याने होणार नाही जनता सत्ता व पैशाचा वापर करणाऱ्यांना योग्य जागा दाखवेल असे सांगितले.
   सुशांत नाईक म्हणाले,लोकसभा निवडणुकीतील पराजयानंतर कुणाला जर वाटत असेल की कोकण हा शिवसेनेचा गड राहिलेला नाही तर तो त्यांचा भ्रम ठरेल. येत्या विधानसभेसहित सर्वच निवडणुकांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातही शिवसेनेचा गड अबाधित असल्याचे दिसून येईल. येथील जनतेचे हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम आहे त्यांच्या विचारांची बांधिलकी घेऊन मतदार आजही शिवसेनेच्या पाठीशी आहे. त्यामुळे येत्या काळात सामाजिक भावनेतून केलेले काम यशस्वी ठरते की पैसा हे निश्चितच जनता दाखवून देईल.
  या प्रसंगी जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभा प्रमुख सतिश सावंत, युवासेना जिल्हा प्रमुख सुशांतनाईक, मा.जि.प.सदस्य वर्षा पवार, युवा सेना तालुका प्रमुख फरीद काझी, विभाग प्रमुख संदीप डोळकर, युवासेना विभाग प्रमुख जितेश जाधव, गिर्ये जहीर ठाकूर,जयदीप तिरर्लोटकर सह शिवसैनिक उपस्थीत होते.