वेंगुर्ला भाजपाच्या वतीने भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोडो मारो आंदोलन.

वेंगुर्ला भाजपाच्या वतीने भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोडो मारो आंदोलन.

वेंगुर्ला.

   डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांना जोडो मारो आंदोलन वेंगुर्ला शहरातील आनंदवाडी येथील समाज मंदिराच्या समोर भाजपाच्या वतीने करण्यात आले.
  यावेळी निषेध व्यक्त करताना भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई म्हणाले की , निवडणूक खोटं बोलून रेटली आणि आता देखिल लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याच्या नादात जितेंद्र आव्हाडचं खोटं उघडं पडलं. बाबासाहेबांचा अपमान करणाऱ्यांना माफी नाही. आत्तापर्यंत जितेंद्र आव्हाडानं अनेक चुका केल्या, पण बाबासाहेबांचा फोटो फाडून त्याच्या पापाचा घडा भरला आहे .
    संविधानाच्या नावानं खोटा टाहो फोडणारे आव्हाडांचे बाप आत्ता मुग गिळून गप्प का?हिंमत असेल तर  संविधान कर्त्याचा फोटो फाडणाऱ्या आव्हाडला पक्षातून बाहेर काढा. इथे आघाडीतले नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडतात आणि तिथे पंतप्रधानाचं स्वप्न पाहणारे  लंडन वारीत व्यस्त हाच या निर्लज्ज आणि खोटारड्या लोकांचा खरा चेहरा.मतांच्या राजकारणासाठी संविधान बचाओ असा निराधार प्रचार करायचा आणि दुसरीकडे संविधानाचे जनक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून फेकायचा  हा खोटेपणा जनता सहन करणार नाही.
   प्रसिद्धी च्या हव्यासा पोटी जाणीव पुर्वक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडुन अपमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड याचा जाहीर निषेध करीत आहोत.
    आंबेडकरी जनतेने आता तरी जागृत व्हावे, महाविकास आघाडी चे आणि जितेंद्र आव्हाड चे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील प्रेम फक्त मतांसाठीचे आहे .
आपल्या वक्तव्याने आणि कृतीने कायम राष्ट्रपुरुषाचा आणि महामानवांचा अपमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड आता जनता आता माफ करणार नाही .
  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला आणि संपूर्ण जगाला मानवतेचा संदेश दिला. पण जितेंद्र आव्हाड सारखा माणूस त्यांचा अपमान करून समस्त दलित बांधवांच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न केलाय.
  यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, जितेंद्र आव्हाडांचा निषेध असो अशा घोषणा देण्यात आल्या.
   यावेळी तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, मा.नगराध्यक्ष राजन गिरप, जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस व वसंत तांडेल, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर व प्रशांत खानोलकर, मच्छिमार सेलचे दादा केळुसकर, खरेदी विक्री संघ चेअरमन ज्ञानेश्वर केळजी, सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब, युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर, किसान मोर्चाचे शिवराम आरोलकर , महीला मोर्चाच्या वृंदा गवंडळकर, बुथ अध्यक्ष विलास कुबल, अनु.जाती मोर्चाचे आर.के.जाधव, युवराज जाधव, विशाखा जाधव, अर्जुन मठकर, मयुरेश जाधव, दिपक जाधव आदी सहभागी झाले होते.