संंगमेश्वर तालुक्यात १ लाख ६५ हजार १६२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार. देवरुख व संंगमेश्वर पोलीस ठाण्याच्यावतीने चोख पोलीस बंदोबस्त.
देवरूख.
लोकसभा निवडणुकिसाठी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. संगमेश्वर तालुक्यातील 1 लाख 65 हजार 162 मतदार मतदान करणार आहेत. २२४ मतदान केंद्रावर हे मतदान पार पडणार आहे. तर देवरुख व संंगमेश्वर पोलीस ठाणे हद्दीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रविवार पासून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघांपैकी चिपळूण, रत्नागिरी, लांजा-राजापूर हे विधानसभा मतदार संघ रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात येतात.रत्नागिरी विधानसभा मतदार संघात 31 केंद्र आहेत, राजापूर मतदार संघात 27 तर संगमेश्वर विधानसभा मतदार संघात 224 मतदार केंद्र आहेत.चिपळूण विधानसभा मतदार संघात 57 हजार 487 पुरुष तर 62 हजार 695 असे 1 लाख 20 हजार 182 मतदार आहेत. रत्नागिरी विधानसभा मतदार संघात 10 हजार 871 पुरुष तर 11 हजार 700 स्त्री अशा 22 हजार 571 मतदार आहेत. राजापूर विधानसभा मतदार संघात 10 हजार 687 पुरुष मतदार तर 11 हजार 722 अशा 22 हजार 409 मतदार आहेत.
संगमेश्वर तालुक्यात १५०० कर्मचारी नेमणूक करण्यात आली आहे तर दोन पोलीस अधिकारी,१२० पोलीस अंमलदार,१०५ होमगार्ड,देवरुख पोलीस स्टेशन स्टाफ ४० असे पोलीस कर्मचारी असणार आहे. देवरुख शहर परिसर तसेच मतदान केंद्रे अशा ठिकाणी हा बंदोबस्त लावण्यात येणार आहे. देवरुख येथील छञपती शिवाजी महाराज चौक येथे वाहतूक नियंञणासाठी एक पोलीस तैनात करण्यात येणार आहे. नागरीकांनी सहकार्य करावे असे आवाहन देवरूखचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी केले आहे.