भाजपा कणकवली तालुकाध्यक्षपदी मिलिंद मेस्त्री, दिलीप तळेकर यांची फेरनिवड

भाजपा कणकवली तालुकाध्यक्षपदी मिलिंद मेस्त्री, दिलीप तळेकर यांची फेरनिवड

 


कणकवली

 

         कणकवली भाजपा तालुका अध्यक्षपदी मिलिंद मेस्त्री व दिलीप तळेकर यांची फेरनिवड करण्यात आली आहे. पक्षीय स्तरावरून तालुकाध्यक्ष पदासाठी काही महिन्यापूर्वी पक्षांतर्गत निवडणूक घेण्यात आली होती. या निवडणुकी नंतर तालुका अध्यक्ष पदाकरता घेतलेल्या निवडीत मिलिंद मेस्त्री व दिलीप तळेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ही निवडणूक बिनविरोध झाली. तालुकाध्यक्षपदी निवड झाल्यावर  मेस्त्री व तळेकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.