केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कौतुक.

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कौतुक.

कणकवली.

     केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांचा वाढदिवस आज साजरा होत आहे. या वाढदिवसाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राणेंचे कौतुक केले आहे.आमच्या सरकारमध्ये एमएसएमई क्षेत्राला बळकट करण्यासाठी नारायण राणे यांनी खूप मेहनत घेतली आहे, असे सांगून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी मी प्रार्थना करतो,अशा शब्दात मोदींनी राणेंना शुभेच्छा दिल्या आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या एक्स अकाउंट वरून आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत.
    नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या एक्स अकाउंट वरून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.आपल्या शुभेच्छा संदेशात त्यांनी म्हटले आहे की, "केंद्रीयमंत्री नारायण राणेजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सार्वजनिक जीवनात अनेक वर्षांचा अनुभव घेऊन तळागाळातील नेता म्हणून त्यांनी ठसा उमटवला आहे. आमच्या सरकारमध्ये एमएसएमई क्षेत्राला बळकट करण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी मी प्रार्थना करतो."