कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पुढील चार दिवस जोरदार पावसाची शक्यता.

कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पुढील चार दिवस जोरदार पावसाची शक्यता.

पुणे.

   राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. गेल्या २४ तासांपासून राज्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस सुरू झाला आहे. कोकण व घाटमाथ्यावर मुसळधार तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात मध्यम पाऊस झाला आहे. हवामान विभागाने पुढील चार दिवस कोकण, मध्य महाराष्ट्रात, विदर्भात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ३० जून ते ३ जुलै या चार दिवसांत पावसाचा जोर जास्त राहण्याचा अंदाज आहे. तसेच विदर्भातही मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
   उद्यापासून पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी विदर्भात, तर राज्याच्या बहुतांश भागात आज ३० ते ते २ जुलै दरम्यान बऱ्याच भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. ३० जून व १ जुलै दरम्यान रायगड, रत्नागिरी, पुणे तर १ जुलैरोजी सिंधुदुर्ग व २ जुलै रोजी पुणे येथे घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर ३० ते 3 जुलै दरम्यान बहुतांश जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना गर्जना विजांचा कडकडाट व ताशी ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याने या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
   ३० जून रोजी पालघर वगळता कोकणात सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने त्या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. ३० जून ते ३ जुलै दरम्यान पालघर ठाणे, सिंधुदुर्ग तर ३० जून ते तीन जुलै दरम्यान सातारा तर १ ते ३ जुलै दरम्यान नाशिक जिल्ह्यात घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.