मदर तेरेसा स्कूलच्या वतीने नामवंत नृत्य कलाकार नीरजा माडकर हिचा सत्कार.

मदर तेरेसा स्कूलच्या वतीने नामवंत नृत्य कलाकार नीरजा माडकर हिचा सत्कार.

वेंगुर्ला.

   येथील मदर तेरेसा स्कूल इयत्ता नववी मध्ये शिकत असलेली  विद्यार्थीनी कु.नीरजा भालचंद्र माडकर हिला चिमणी पाखर डान्स अकॅडमी तर्फे नामवंत नृत्य कलाकार या सन्मानाने  गौरविण्यात आले.तिला मेडल, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात आले.या अकॅडमी चे मालक रवी कुडाळकर यांच्या उपस्थितीत कुडाळ येथे हा सन्मान देण्यात आला.
    कु.नीरजा माडकर हिला लहानपणापासून नृत्याची आवड इयत्ता पाचवी पासुन तिला तुळशीदास आर्लेकर वेंगुर्ला यांचे मार्गदर्शन लाभले.अनेक जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये तिने प्रथम क्रमांक मिळवला आहे. तिला यापूर्वी 'अनमोल रत्न' हा गोव्यात पुरस्कार मिळाला. 'वंदे मातरम' सांगली मध्ये देशव्यापी कार्यक्रमात तिला प्रमाणपत्र प्राप्त झाले, तसेच वेंगुर्ला येथे महिला दिनानिमित्त सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.वेंगुर्ला मध्ये डान्सिंग सुपरस्टार मध्ये प्रथम क्रमांक व भरतनाट्यम नृत्यांगना हा 'किताब तिने प्राप्त केला.या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक फादर फेलिक्स लोबो तसेच शिक्षक, पालक यांनी तिचे शाळेतर्फे अभिनंदन केले जात आहे.