बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी इन्सुली राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; पंढरपूर येथील एकाला ताब्यात.

सावंतवाडी.
बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी इन्सुली राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाने पंढरपूर येथील एकाला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई काल रात्री उशिरा आरोसबाग तिठ्याजवळ करण्यात आली. विशाल बिभीषण गायकवाड (वय २७, रा. वाखरी, पंढरपूर) असे त्याचे नाव आहेत. त्याच्याकडून दीड लाखाच्या दारूसह चार लाखाची गाडी असा मिळून साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.