सिंधुदुर्ग जिल्हा बँक सर्वसामान्यांच्या पाठीशी - नितेश राणे
देवगड
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण, महिला आणि व्यावसायिकांनी आर्थिक नियोजनाचे स्वप्न पहावे, त्यांच्या प्रगतीसाठी जिल्हा बँक सदैव पाठीशी उभी राहील, असा विश्वास राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. शिरगाव येथे जिल्हा बँकेच्या स्वमालकीच्या नूतन इमारत स्थलांतर सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी बोलताना नितेश राणे म्हणाले की, खासदार नारायण राणे साहेबांचे कोकणावर आणि जिल्ह्यावर विशेष प्रेम आहे.बँकेचा कारभार पारदर्शक असावा, असा त्यांचा नेहमीच आग्रह असतो आणि त्यांच्या याच स्वप्नातील पारदर्शक कारभाराला अध्यक्ष मनीष दळवी समर्थपणे चालना देत आहेत. ही आपली हक्काची बँक असून, सर्वांनी आत्मविश्वासाने मोठे पाऊल टाकावे, प्रशासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी सांगितले की, राणे साहेबांच्या मार्गदर्शनानुसार सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून बँकेची वाटचाल सुरू आहे. बँकेने केवळ व्यवसायात वाढ केली नसून, नफ्यासोबतच सर्वसामान्य शेतकरी, व्यापारी आणि महिलांना सक्षम करण्याचे काम केले आहे.या सोहळ्याला जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, संचालक प्रकाश बोडस, संदीप साटम, अॅड. प्रसाद करंदीकर, जिल्हा परिषद सदस्य देवदत्त कदम, पंचायत समिती सदस्य शीतल तावडे, सलोनी तळवडेकर, शिरगाव वि. सोसा. चेअरमन विश्राम लोके, सत्यवान सावंत, रामचंद्र राणे, अरविंद पवार, सुरेश राणे, सदानंद देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी दिवाकर देसाई, शरद सावंत, नितीन सावंत, शाखा व्यवस्थापक बापू शेळके, संजय घाडी, संजय परब यांच्यासह बँकेचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ आणि ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
konkansamwad 
