परूळे येथील श्री देव गौरीशंकर मंदिरात महाशिवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

परूळे येथील श्री देव गौरीशंकर मंदिरात महाशिवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

वेंगुर्ला.

   तालुक्यातील परूळे येथील श्री देव गौरीशंकर मंदिरात महाशिवरात्र उत्सवानिमित्त दि.६ ते ८ मार्च रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
  यानिमित्ताने बुधवार दि.६ मार्च रोजी रात्री ८ वाजता अरुण केळुसकर प्रस्तुत सोलो वादन कार्यक्रम सादर करते विनायक जोशी अतिश सामंत आदिनाथ सामंत कौशल दूधवडकर, ९ वाजता पुराण वाचन त्यानंतर श्रींची पालखी प्रदक्षिणा ११ वाजता दीपक सामंत यांचे कीर्तन.
    दि.७ मार्च रोजी सायं ५ वाजता संत गाडगे महाराज कलानिकेतन आंदूर्ले यांचे अभंगवाणी व भक्तीगीत कार्यक्रम, रात्री ९ वाजता पुराण वाचन, त्यानंतर श्रींची पालखी प्रदक्षिणा, ११ वाजता दिपक सामंत यांचे कीर्तन.
  दि. ८ मार्च  रोजी सकाळी ८ वाजल्यापासून धार्मिक विधी, दुपारी ३.३० वा. चिंतामणी सामंत शेळपी यांचे कीर्तन, रात्री ९ वा. पुराण वाचन व त्यानंतर श्रींची पालखी प्रदक्षिणा, १०.३० वा वावळेश्वर दशावतार नाट्य मंडळ ते़डोली यांचा दशावतारी नाट्य प्रयोग सादर होणार आहेत.तरी भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.