कणकवलीत जाहीर धम्ममित्र समारंभाचे आयोजन.

कणकवलीत जाहीर धम्ममित्र समारंभाचे आयोजन.

 

कणकवली


          त्रिरत्न बौद्ध महासंघ सिंधुदुर्ग यांच्यातर्फे रविवार दिनांक 6 एप्रिल रोजी सकाळी 10:30 वाजता बुद्ध विहार कणकवली येथे जाहीर धम्ममित्र समारंभ आयोजित करण्यात आला आहे. आपल्या जीवनात जाणीवपूर्व पंचशीलाचे आचरण करून बुद्ध धम्म आणि संघ या त्रिरत्नांना अधिक जाणून घेण्यासाठी कटिबद्ध असणाऱ्या व परमपूज्य बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धम्मक्रांती अधिक गतिमान करण्यासाठी प्रतिज्ञाबद्ध असणाऱ्या काही धम्म सहाय्यकांचा जाहीर धम्ममित्र समारंभ आयोजित करण्यात आला असून या समारंभानिमित्त धम्मचारी यशोसागर (पुणे) यांच्या धम्मप्रवचनाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. तरी धम्मप्रवचनासोबतच नवोदित धम्ममित्रांना शुभेच्छा देण्यासाठी व त्यांचे अभिनंदन करण्यासाठी या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन त्रिरत्न बौद्ध महासंघ सिंधुदुर्ग यांच्यातर्फे करण्यात आले आहे.