शिवसेना कुडाळ तालुका सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी मिलिंद नाईक तर उपाध्यक्षपदी लीलाधर अणावकर यांची निवड.
कुडाळ.
एमआयडीसी विश्रामगृह कुडाळ येथे आज आमदार मा वैभवजी नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ तालुक्यातील शिवसेनेच्या सर्व सरपंच व उपसरपंच यांची बैठक संपन्न झाली.लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना शासनाच्या विविध योजनांचा लाभ लोकांना कसा मिळवून द्यावा, नागरिकांची छोटी मोठी कामे कशाप्रकारे मार्गी लावावीत याचे उत्तम मार्गदर्शन यावेळी आमदार महोदयांनी उपस्थितांना केले.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कुडाळ तालुक्यातील नवीन सरपंच उपसरपंच संघटनेची स्थापना करण्यात आली. संघटनेच्या अध्यक्षपदी तुळसुली सरपंच श्री मिलिंद नाईक, उपाध्यक्षपदी अणाव गावचे सरपंच श्री लीलाधर अणावकर तर सचिव पदी वसोली सरपंच श्री अजित परब यांची नियुक्ती करण्यात आली. आमदार वैभव नाईक यांनी सर्व सरपंच व उपसरपंच यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व जनतेच्या कामासाठी लागणारे सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी उपजिल्हा प्रमुख श्री अमरसेन सावंत, ओबीसी जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर, तालुका प्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, अतुल बंगे, बाळा कोरगावकर, बाळू पालव, संतोष पाटील, सचिन कदम, सुशील चिंदरकर, राजू गवंडे, अनुप नाईक, किरण शिंदे तसेच भिकाजी बागवे, सुधाकर पडकील, पूर्वा परब, आरोही चव्हाण, संध्या मुळदेकर, प्रवीण पालव, संतोष सामंत, अजित परब, नरेंद्र राणे, धिरेंद्र चव्हाण, प्रदीप गावडे, मुकुंद सरनोबत, गौतमी कासकर, पल्लवी पणदूरकर, उल्का खंदारे, मनीषा भोसले, लीलाधर अनावकर, तुषार सामंत, आरती वारंग, साबाजी मस्के, वैशाली पावसकर, भक्ती घाडीगावकर, दक्षता मेस्त्री, मंगेश गावकर, रुपेश तायशेटे, महेंद्र राऊळ, गणपत परब, दत्ता म्हादळकर, महेश जामदार, गुरुनाथ पेडणेकर, विजय आंगणे, हरिश्चंद्र वायंगणकर, पुनम पवार, योगेश्वरी कोरगावकर, सचिन गावडे, महेंद्र पिंगुळकर, विवेक कुपेरकर, मनोज पाताडे, सागर भोगटे, अनघा तेंडोलकर, सुजाता बावकर, संदेश प्रभू आदी शिवसेना सरपंच, उपसरपंच व पदाधिकारी उपस्थित होते.