श्री देव काजरोबा जत्रोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न.
सावंतवाडी.
तालुक्यातील कवठणी येथील श्री देव काजरोबा देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. भाविकांची मनोकामना पूर्ण करणारा व भक्ताला आपल्या शक्तीची प्रचिती घडवून तेवढ्याच श्रद्धेने भक्तांकडून नवस फेडून घेणारे देवस्थान म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल खाडीच्या तीरावर वसलेले व गोवा राज्याच्या सीमेलगतचे कवठणीतील श्री देव काजरोबा माऊली देवस्थान होय.
माघ शुक्ल पक्ष दशमी मधे श्री देव काजरोबाची जत्रा होते. यावेळी मुख्य प्रसाद केळी- केळ्यांचा घड देवाला अर्पण करून हजारो भाविकांनी देवाच्या वार्षिक उत्सवावेळी आपला नवस फेडला.संपुर्ण सिंधुदुर्ग व गोवा राज्यातही प्रसिद्ध असणाऱ्या श्री देव काजरोबाच्या दर्शनासाठी गोवा, बेळगाव, कोल्हापुर, रत्नागिरी, ठाणे, मुंबईवरून भाविक मोठ्या प्रमाणावर दाखल झाले होते.