परुळे येथे २९ रोजी रक्तदान शिबिर.

परुळे येथे २९ रोजी रक्तदान शिबिर.

वेंगुर्ला.

  श्री महालक्ष्मी ज्ञानवर्धिनी वाचनालय परुळे आणि युनिक ब्लड मोटिवेटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्हा रक्तपेढी यांच्या माध्यमातून परुळे येथे गुरुवार दि.२९ ऑगस्ट २०२४  रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर परुळे ग्रामपंचायतच्या हॉल मध्ये सकाळी ९ ते १ या कालावधीत पार पडेल.  परुळे पंचक्रोशी, पाट- म्हापण पंचक्रोशीतील रक्तदाते नाव नोंदणी करून यामध्ये सहभागी होऊ शकतात.नाव नोंदणी करण्यासाठी अक्षता परुळेकर - 9137735588 यांच्याशी संपर्क साधावा. रक्तदानाची गरज व महत्व ओळखून बहुसंख्य रक्तदात्यांनी सामाजिक कर्तव्य पार पाडत यात सहभागी व्हावे असे आवाहन या संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.