वेंगुर्ला रोटरी क्लबच्या वतीने वेंगुर्ला शाळा नं.१ला पाण्याची टाकी प्रदान.

वेंगुर्ला रोटरी क्लबच्या वतीने वेंगुर्ला शाळा नं.१ला पाण्याची टाकी प्रदान.

वेंगुर्ला.

   शहरातील प्राथमिक शाळा वेंगुर्ला नं.१ मधील   विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी व स्वच्छतागृहासाठी  पाण्याच्या टाकीची अत्यंत आवश्यकता होती. शिक्षक पालक संघाच्या माध्यमातून ही बाब लक्षात आल्यानंतर, रोटरी वेंगुर्ला मिडटाऊनचे सेक्रेटरी रोटरियन योगेश नाईक यांनी पुढाकार घेऊन, प्रेसिडेंट शंकर वजराटकर यांच्या माध्यमातून वाॅटर ॲण्ड सॅनिटेशन अंतर्गत ही सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले. विद्यार्थ्यांंची गरज लक्षात घेऊन,  रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० चे भावी प्रांतपाल रोटरीयन शरद पै यांच्याहस्ते प्राथमिक शाळा वेंगुर्ला नंबर १ला पाण्याची टाकी प्रदान करण्यात आली.
    यावेळी बेळगाव रोटरी क्लबचे जीवन खटाव, रोटरी वेंगुर्ला मिडटाऊनचे प्रेसिडेंट शंकर वजराटकर, सेक्रेटरी योगेश नाईक, ऍड प्रथमेश नाईक,डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी राजेश घाटवळ, पास्ट प्रेसिडेंट सुनील रेडकर, सदाशिव भेंडवडे, आनंद बोवलेकर, मृणाल परब,  वसंतराव पाटोळे, शाळा वेंगुर्ला नंबर १ चे मुख्याध्यापक व शिक्षक, पालक उपस्थित होते. यावेळी भावी प्रांतपाल रोटरीयन शरद पै यांनी या शाळेची गरज लक्षात घेऊन रोटरी वेंगुर्ला मिडटाऊनने वाॅटर ॲण्ड सॅनिटेशन अंतर्गत डिस्ट्रिक्ट प्रोजेक्ट घेण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. शाळेची गरज लक्षात घेऊन पाण्याची टाकी प्रदान केल्याबद्दल मुख्याध्यापक यांनी आभार मानले.