विशाल परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ला येथील वारकऱ्यांना मोफत देवदर्शन सहल.

विशाल परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ला येथील वारकऱ्यांना मोफत देवदर्शन सहल.

वेंगुर्ला.

   भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष व युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले तालुक्यातील ४५ वारकरी संप्रदायातील मंडळींना मोफत देवदर्शन सहलीचा शुभारंभ शनिवार दिनांक १५ जुन रोजी सायंकाळी ५:३० वाजता चांदेरकर महाराज विठ्ठल मंदिर येथे होणार आहे .
  मोहीनी एकादशी निमीत्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात विशाल परब यांनी नारायण राणे हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातुन विजयी झाल्यावर वारकरी मंडळींना मोफत देवदर्शन सहल घडवून आणेन,असे अभिवचन दिले होते.त्याचीच पुर्तता म्हणुन तुळजापूर - अक्कलकोट - पंढरपूर - नृहसिंहवाडी - महालक्ष्मी कोल्हापूर अशी तीन दिवसांची सहल आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे वारकरी संप्रदायातील मंडळींमध्ये उस्ताहाचे वातावरण निर्माण झाले आहे.