वेंगुर्ला येथे उद्या तालुकास्तरीय सामाजिक हक्क संवर्धन परिषद. मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन.

वेंगुर्ला.
भारत मुक्ती मोर्चा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महीला मंडळ, आनंदवाडी, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने
राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, फातिमा शेख व माता रमाबाई आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त वेंगुर्ला तालुकास्तरीय सामाजिक हक्क संवर्धन परिषद रविवार दि.११ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी २.०० ते सायं. ५.३० वा.
साई मंगल कार्यालय वेंगुर्ला येथे आयोजित करण्यात आली आहे.
यावेळी उद्घाटक ॲड.नविना राऊळ, प्रमुख वक्ता ॲड. माया जमदाडे, प्रमुख मान्यवर, अध्यक्षता प्रा. प्रमोद जमदाडे राज्य प्रचारक, गोवा राज्य प्रभारी मार्गदर्शन करणार आहेत. तरी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सावित्रीबाई फुले महिला मंडळ वेंगुर्ला, बुद्धिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क सिंधुदुर्ग, भारतीय विद्यार्थी मोर्चा, सिंधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात आले आहे.