माडखोल येथील आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

माडखोल येथील आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

सावंतवाडी.

    माडखोल येथील व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी शंभरहून अधिक रुग्णांनी आरोग्य तपासणी केली. आमदार व संस्थेचे पदाधिकारी राहुल पाटील यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने माडखोल धवडकी येथील दत्त मंदिरात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मधुमेह, रक्तदाब तपासणी करण्यात आली.
   शिबीर यशस्वी होण्यासाठी डि. फार्म, बी. फार्म, व एम. फार्म या अभ्यासक्रमातील विद्यार्थी आणि प्राध्यापिका मनाली वैद्य, दीप्ती फडते, वर्षा राणे, मेघा जाधव आदींनी सहकार्य केले.