वेंगुर्ला पथ विक्रेत्यांसाठी नगरपरिषदेची महत्वाची सूचना.

वेंगुर्ला पथ विक्रेत्यांसाठी नगरपरिषदेची महत्वाची सूचना.

वेंगुर्ला. 

   वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीतील मुख्‍य रस्‍त्‍यांच्‍या दुर्तफा बसणारे किरकोळ भाजी विक्रेते,फळ विक्रेते, फुल विक्रेते व फेरीवाले यांच्‍यामुळे शहरातील मुख्‍य बाजारपेठ परिसरात वाहतूक कोंडी होत असून व्‍यापारी व नागरिकांना त्‍याचा मनस्‍ताप सहन करावा लागत आहे.मुख्‍य रस्‍त्‍यांच्‍या दुर्तफा बसणारे किरकोळ भाजी विक्रेते,  फळ विक्रेते, फुल विक्रेते व फेरीवाले यांच्यासाठी वेंगुर्ला नगरपरिषदेच्‍या भाजी मार्केट परिसरात बैठक व्‍यवस्‍था करण्‍यात आलेली आहे त्‍यांनी इतरत्र ठिकाणी न बसता पर्यायी व्‍यवस्‍था केलेल्‍या ठिकाणी बसणे बंधनकारक करण्‍यात आलेले असून त्‍याचे पालन न केल्‍यास त्‍यांचे दंडात्‍मक कारवाई करण्‍यात येणार आहे असे आवाहन वेंगुर्ला नगरपरिषद कडून करण्यात आले आहे.भाजी मार्केटचा दर्शनी भाग हा अवजड वाहनांमधील माल उतरविण्‍यासाठी राखीव ठेवण्‍यात आलेला असून त्‍या भागामध्‍ये व मुख्‍य रस्‍त्‍यांचा दुर्तफा नागरीकांकडून दुचाकी व चारचाकी वाहने पार्कीग करण्‍यात येतात त्‍यामुळे अवजड वाहने मुख्‍य रस्‍त्यांवर उभी करुन माल उतरविण्‍यात येतो परिणामी वाहतूक कोंडी निर्माण होते. वाहनचालकांनी आपली वाहने पार्क करणेसाठी वेंगुर्ला नगरपरिषदेच्‍या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील पार्कींगचा वापर करावा, या नियमाचे उल्‍लंघन केल्‍यास नगरपरिषद प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्‍या संयुक्‍त विदयमाने प्रचलित नियमानूसार दंडात्‍मक कारवाई करण्‍यात येईल असे सांगण्यात आले आहे.