ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या. ओबीसी व आरक्षित समाज महासंघाची मागणी.

कणकवली.
मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध नाही मात्र ओबिसी च्या आरक्षणाला धक्का नलागता मराठा समाजाला आरक्षण द्या. हवे असल्यास घटना दुरुस्ती करावी. ओबीसीची जनगणना करावी अशी मागणी ओबीसी व आरक्षित समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन वाळके यांनी पत्रकार परिषदेत केली.
ओबीसी हे फुगीर आरक्षण दिले जात आहे याला आमचा आक्षेप आहे. तो आकडे वरिवर आहे. जात निहाय जनगणना आहे त्यावर जे दावे केले जात आहे ते खोडसाळ आहेत. ओबीसी समाज जर कमी असेल तर आधी जात निहाय जनगणना करण्याची गरज आहे.तरी आम्ही दीड महिन्यात 48 समाजाची जनगणना आम्ही आमच्या स्थरावर करणार आहोत. आज घडीला 52 टक्के समाज ओबीसी आहे. त्यामुळे आम्हाला .जास्त आरक्षण नाही.मिळत असलेले ओबीसी आरक्षण योग्य आहे.राजकीय आरक्षण काडून घेण्याचे प्रयत्न सुरू आहे. त्याचा वाद न्यायालयात चालू आहे.राज्यात गेली पाच वर्षे ओबीसी मधील सर्व समाज संघटित करून वज्र मूठ करण्याचा प्रयत्न चालू आहे.48 साजाचे एकत्र येवून हे काम सुरू केले आहे.
यावेळी पत्रकार परिषदेसाठी डॉक्टर प्रकाश भांगरत चंद्रशेखर उपरकर वसंत भुरे ,अनिल भोईर,विलास गुडेकर, मल्लाप्पा इंगळे, ओंकार चिंदरकर, महेश परुळेकर, दादा कुडतरकर निलेश ठाकूर ,नंदन वेंगुर्लेकर ,विलास कोरगावकर ,निलेश ठाकूर, दीपक बेलवलकर आदी उपस्थित होते.