भाजपाच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा सत्कार.

भाजपाच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा सत्कार.

वेंगुर्ला.

   दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांचा जन्म ६ जानेवारी १८१२ रोजी झाला.तर त्यांनी दर्पण हे पहीले मराठी भाषेतील वृत्तपत्र ६ जानेवारी १८३२ रोजी सुरु केले. त्यामुळेच हा दिवस दरवर्षी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.
  दरवर्षी ह्या पत्रकार दिनाच्या निमित्ताने जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पुरस्कार पत्रकारांना देण्यात येतो. ह्यावर्षी जिल्हास्तरीय पुरस्कार वेंगुर्ले तालुक्यातील दैनिक लोकमत चे भैय्या गुरव, तसेच वेंगुर्ले तालुक्याचे कै.अरुण काणेकर स्मृती पुरस्कार प्रदिप सावंत यांना व कै.संजय मालवणकर स्मृती आदर्श पुरस्कार अजित राऊळ यांना घोषित झाला. या सर्वांचा सत्कार वेंगुर्ले पत्रकार संघाच्या कार्यालयात भाजपाच्या वतीने करण्यात आला.
  यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष मॅक्सी कार्डोज, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, मा.नगराध्यक्ष राजन गिरप, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, दै.प्रहार चे दाजी नाईक, दै.तरुण भारत चे महेंद्र मातोंडकर व भरत सातोस्कर, दै.सामना चे वीनय वारंग , दै.कोकणसाद चे दिपेश परब, साप्ताहिक नवप्रभात चे योगेश तांडेल, सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब, युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर व मारुती दोडशानट्टी, दिलीप परब इत्यादी उपस्थित होते.