पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण.

मालवण.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आगमन झाले असून मालवण येथील समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या राजकोट या ठिकाणी नव्याने उभारण्यात आलेल्या 45 फूट उंचीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आले आहे.भारतीय नौसेना आपला वर्धापन दिन मालवण येथील सिंधुदुर्ग किनारा किल्ल्याजवळ मोठ्या दिमाखाने साजरा करत आहे. या नौसेनादिनानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नारायण राणे, महाराष्ट्राचे राज्यपाल तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह नौसेना प्रमुख आदी उपस्थित होते.