वेंगुर्ला येथील आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; ६७ जणांनी केले रक्तदान.

वेंगुर्ला येथील आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; ६७ जणांनी केले रक्तदान.

वेंगुर्ला.

  गोवा बांबोळी येथील रक्तपेढीमध्ये रक्ताचा प्रचंड तुटवडा असल्याने गोवा रक्तपेढीकडून सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्गशी याबाबत संपर्क साधून रक्तदान शिबीर आयोजित करण्याबाबत चर्चा करण्यात आली.त्यासार अवघ्या ८ दिवसात वेंगुर्ला येथील आयटीआयमधील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने आज बुधवार दि ८ नोव्हेंबर २०२३ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन वेंगुर्ला आयटीआय येथे (कॅम्प - म्हाडा कॉलनी) यशस्वीपणे करण्यात आले.या रक्तदान शिबिराला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी एकूण ६७ रक्तदात्यांनी या शिबिरात सहभाग घेतला.त्यापैकी ४४ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
    शिबिराचे उद्घाटन प्र.प्राचार्य जगदीश गवस,सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्गचे उपाध्यक्ष महेश राऊळ,गोवा राज्य समन्वयक तथा विभागीय अध्यक्ष संजय पिळणकर,वेंगुर्ला कार्यकारिणी अध्यक्ष ऍलिस्टर ब्रिटो,उपाध्यक्ष सौ.समृद्धी पिळणकर, शिक्षक संदीप धुरी,फर्नांडिस सर, साबळे मॅडम,तोरसकर सर,नर्तवडेकर सर,लिखारे मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
   रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी प्रतीक खानोलकर,संदीप धुरी सर, यशवंत कोरगावकर,सौ उर्मिला पेडणेकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.या शिबिराचे सूत्रसंचालन सौ समृद्धी संजय पिळणकर यांनी केले तर आभार संजय पिळणकर यांनी मानले.