मुंबई विद्यापीठाच्या मेकॅट्रॉनिक्स विभागात पहिले तिन्ही विद्यार्थी एस एस पी एम इंजिनीरिंग कॉलेज कणकवलीचे.
कणकवली.
मुंबई विद्यापीठाच्या डिसेंबर २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या सेमिस्टर - VII च्या निकालात पहिले तीन विद्यार्थी S.S.P.M. इंजिनीरिंग कॉलेज कणकवलीचे आले आहेत. तेजस गोपी नाईक (९.२७) प्रथम, प्राजक्ता संदीप नाईकधुरे (९.१४) व्दितीय, वैभव विश्वनाथ साईल (८.८६) तृतीय आणि भालचंद्र निलेश धडाम (८.१९) सातवा सदर विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या पहिल्या दहामध्ये येण्याचा मान मिळविला आहे.
सदर सेमिस्टरच्या Digital Signal Processing या विषयात प्राजक्ता संदीप नाईकधुरे ही विद्यार्थिनी ८० पैकी ८० गुण मिळवून विद्यापीठात प्रथम तसेच Disaster Management & Mitigation Measures या विषयात वैभव विश्वनाथ साईल हा विद्यार्थी ८० पैकी ७० गुण मिळवून विद्यापीठात प्रथम आले आहेत.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा सौ.निलम राणे, उपाध्यक्ष निलेश राणे, सचिव नितेश राणे, प्राचार्य डॉ.डी.एस.बाडकर, प्रशासकीय अधिकारी श्री.शांतेश रावराणे तसेच महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.