सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने गणपती आरास सजावट स्पर्धेचे आयोजन. जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांची माहिती.

सिंधुदुर्ग.
सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्ह्यामधील गणेशोत्सवा निमित्त घरगुती गणपती आरास सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ दोन अशी एकूण पाच बक्षिसे देण्यात येणार आहेत. प्रथम बक्षीस 11, 111 रुपये, द्वितीय बक्षीस 7,777 रुपये, तृतीय बक्षीस 5,555 रुपये व उत्तेजनार्थ बक्षीस 1,111 रुपये आहे. अशी माहिती राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी सावंतवाडी येथे आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी आपल्या घरातील गणपतीच्या जवळ केलेल्या सजावटीचा, चलचित्राचा एक मिनिटांचा व्हिडीओ बनवून वॉटसअॅप द्वारे पाठवायचा आहे. सोबत स्पर्धकांचे संपूर्ण नाव, पूर्ण पत्ता व मोबाईल नंबर नमुद करणे गरजेचे आहे.ही स्पर्धा जिल्ह्यात आठही तालुक्यात घेण्यात येणार असून प्रत्येक तालुक्यात प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ दोन अशी जिल्ह्यात एकूण चाळीस पारितोषिके दिली जातील.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील विजेत्यांना पारितोषिक वितरण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी संपर्क मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते करण्यात येईल. गेल्यावर्षी या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला होता जिल्ह्यातून अंदाजे सहाशे स्पर्धकाने भाग घेतला होता असे यावेळी इर्शाद शेख यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी जिल्हा स्पर्धा मुख्य समन्वयक अरविंद मोंडकर 9892055820 यांच्याशी संपर्क करावा असे शेख म्हणाले. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत, तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर, ॲड. राघवेंद्र नार्वेकर, समीर वंजारी, माया चिटणीस वगैरे पदाधिकारी उपस्थित होते.