भोगवे तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी रमेश गावडे.

भोगवे तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी रमेश गावडे.

वेंगुर्ला.

   तालुक्यातील भोगवे गाव तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी रमेश सावळाराम गावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.भोगवे ग्रामपंचयतीची सर्वसाधारण ग्रामसभा नुकतीच किल्लेनिवती शाळा येथे संपन्न झाली.
   यावेळी सरपंच अंकिता वायंगणकर,  उपसरपंच रुपेश मुंडये, ग्रा.प.सदस्य मिलिंद सामंत, सखाराम केसरकर, मनाली गायकवाड़, दिगंबर केसरकर, यांसह चेअरमन आदीनारायण सोसायटी चेतन सामंत, रविंद्र कासवकर, रामकृष्ण पाटकर, प्रतिक्षा मुंडये, अनील सामंत, तुषार सामंत, आरोग्य सेवक सूर्यकांत मठकर, आरोग्य सेविका एस. एस. आरोलकर, कोतवाल चंद्रकांत गोसावी यांजसह आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते.
   ग्रामसेवक मंगेश माईक यांनी ग्रामसभेचे कामकाज पाहीले. यावेळी ग्रामसभेच्या विषयानुसार चर्चा करण्यात आली. तंटामुक्त समिती अध्यक्ष पदी रमेश गावडे बिनविरोध निवड झाली याबद्दल श्री. गावडे यांचे सर्वांनी अभिनंदन केले.