वेंगुर्ला भाजपाच्या वतीने जागतिक रक्तदाता दिनाच्या निमित्ताने वेताळ प्रतिष्ठान आणि रक्तदात्यांचा सन्मान.

वेंगुर्ला भाजपाच्या वतीने जागतिक रक्तदाता दिनाच्या निमित्ताने वेताळ प्रतिष्ठान आणि रक्तदात्यांचा सन्मान.

वेंगुर्ला.

  जागतिक रक्तदाता दिनाच्या निमित्ताने जगभर विविध उपक्रम राबवले जातात. भाजपा वेंगुर्ले च्या वतीनेही रक्तदात्यांचा सन्मान आयोजित करण्यात आला. मानव कितीही प्रगत झाला तरी रक्त हे कृत्रिमरित्या तयार करता येत नाही.त्यामुळे माणसाचा प्राण वाचवण्यासाठी रक्तदान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
   गेली काही वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये बहुआयामी काम करणाऱ्या वेताळ प्रतिष्ठानने गेल्या नऊ वर्षांमध्ये सलग २५ रक्तदान शिबिरे घेऊन आपली सामाजिक समरसता जपली याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या वतीने वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस या संस्थेचा विशेष सन्मान तालुकाध्यक्ष सुहास गवडळकर यांच्या हस्ते करण्यात आला. सदर सन्मान प्रतिष्ठानचे सचिव प्रा.डॉ.सचिन परुळकर यांनी स्वीकारला.
   यावेळी जागतिक रक्तदाता दिवसाच्या निमित्ताने वेळोवेळी रक्तदान करणाऱ्या प्रातनिधिक रक्तदात्यांचा सन्मान करण्यात आला.त्यावेळी २९ वेळा रक्तदान करणारे वेताळ प्रतिष्ठानचे खजिनदार माधव विजय तुळसकर, शेखर काणेकर, सुधीर पालयेकर, रक्तदान शिबीर आयोजनात अग्रणी असणारे किरण भालचंद्र राऊळ यांचा भाजपाच्या वतीने शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
   यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळू देसाई यांनी रक्तदान आणि रक्तदान शिबिरात आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वेताळ प्रतिष्ठानच्या कार्याचा आढावा घेत सातत्याने रक्तदान करत रहा आम्ही आपल्या पाठीशी आहोत असे प्रतिपादन केले तसेच त्यांनी रक्तदान चळवळीचे महत्त्व विशद केले.
   यावेळी व्यासपीठावर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बाळु देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवडळकर, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, महीला शहर अध्यक्षा श्रेया मयेकर ,ता.सरचिटणीस प्रशांत खानोलकर, जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस, सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब, किरण कुबल, ता.चिटणीस जयंत मोंडकर, सुरेंद्र चव्हाण, बुथ अध्यक्ष रवी शिरसाट व राजन केरकर, छोटू कुबल उपस्थित होते.