वेंगुर्ला नगर‍परिषदेमार्फत प्‍लॅस्‍टीक जप्‍तीची कारवाई.

वेंगुर्ला नगर‍परिषदेमार्फत प्‍लॅस्‍टीक जप्‍तीची कारवाई.

वेंगुर्ला.

   शासनामार्फत प्‍लॅस्‍टीक बंदी लागू करण्‍यात आलेली आहे. त्‍याअनुषंगाने  वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत प्‍लॅस्टिक बंदीची जनजागृती स्‍थानि‍क वृत्‍तपत्रामध्‍ये आणि सोशल मिडियाद्वारे करण्‍यात आलेली होती.
   वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्‍याधिकारी श्री. परितोष कंकाळ यांच्‍या मार्गदर्शनाखाली दिनांक १०/०४/२०२४ रोजी वेंगुर्ला बाजारपेठेत प्‍लॅस्टिक जप्‍तीची कारवाई करण्‍यात आली. यामध्‍ये ५० मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्‍या ३ किलो एवढया वजनाच्‍या प्‍लॅस्टिक पिशव्‍या जप्‍त करुन दंडात्‍मक कारवाई करण्‍यात आली.
   वेंगुर्ला शहरातील मच्‍छी विक्रेते, व्‍यापारी व नागरीकांनी ५० मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्‍या प्‍लॅस्टिक पिशव्‍यांचा विक्री व वापर  करू नये अन्‍यथा दंडात्‍मक कारवाई करण्‍यात येईल याची नोंद घ्‍यावी व ५० मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्‍या प्‍लॅस्टिक पिशव्‍या विक्री करणाऱ्यांची माहिती नगरपरिषद प्रशासनास देवून सहकार्य करावे असे आवाहन मुख्‍याधिकारी श्री. परितोष कंकाळ यांनी केले आहे.