सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक अनिल गोवेकर यांचेकडून उभादांडा न्यू इंग्लिश स्कूलला क्रीडा साहित्य प्रदान.

सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक अनिल गोवेकर यांचेकडून उभादांडा न्यू इंग्लिश स्कूलला क्रीडा साहित्य प्रदान.

वेंगुर्ला.

     न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा विद्यालयातील विद्यार्थ्याना व शाळा संस्थेस क्रीडा क्षेत्रात भरघोस यश देणारे क्रीडाप्रेमी शिस्तप्रिय विज्ञाननिष्ट सामाजिक कार्यकर्ता व साहित्य - सांस्कृतिक क्षेत्रात लौकीक प्राप्त क्रीडा शिक्षक अनिल बाबुराव गोवेकर हे दिनांक ३१ ऑक्टोंबर २०२२ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यावेळी त्यांच्या झालेल्या सेवानिवृत्ती सत्करात त्याही विद्यालयास रू. १०,००० किमतीचे क्रीडा साहित्य देण्याचे आश्वासन दिले होते. 'बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले' या उक्तीप्रमाणे श्री. गोवेकर यांनी विद्यालयात कॅरम बोर्डस्, बुध्दिबळ सेट्स, बॅट व विविध प्रकारचे चेंडू असे अनेक प्रकारचे रू.१२,५००. किमतीचे क्रिडा साहित्य प्रदान केले.
   या दातृत्वाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक उमेश वाळवेकर, संस्था चेअरमन वीरेंद्र कामत आडारकर, संस्था सेक्रेटरी रमेश नरसुले, संस्था कार्यकारिणी सदस्य, पालक, शिक्षक संघ ब शाळा व्यवस्थापन समिती यांनी श्री.गोवेकर यांचे हार्दिक आभार मानले.