मेक्सिको मध्ये सापडली १००० वर्षापूर्वीची माया योध्याची मूर्ती.

मेक्सिको मध्ये सापडली १००० वर्षापूर्वीची माया योध्याची मूर्ती.
मेक्सिको मध्ये सापडली १००० वर्षापूर्वीची माया योध्याची मूर्ती.
मेक्सिको मध्ये सापडली १००० वर्षापूर्वीची माया योध्याची मूर्ती.

मेक्सिको.

  मेक्सिकोच्या युकाटान राज्यातील चिचेन इत्झा या पुरातत्व स्थळावर एक मोठा शोध लागला आहे, येथे माया योद्ध्याची मूर्ती सापडली आहे, ज्याच्या डोक्यावर नागराजासारखा नागाचा मुकुट आहे. ही मूर्ती एक हजार वर्षांपूर्वीची असल्याची सांगितली जात आहे.
    मेक्सिकोच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एन्थ्रोपोलॉजी अँड हिस्ट्री (INAH) ने एका निवेदनात म्हटले आहे की, मूर्तीमध्ये एक योद्धा सापाच्या आकाराचं हेल्मेट घातलेला दिसत आहे. त्यावर एक पंख असलेला शिरस्त्राण घातलेलं दाखवण्यात येत आहे. पुतळा १३ इंच (३३ सें.मी.) उंच आणि ११ इंच (२८ सें.मी.) रुंद आहे आणि चांगल्या स्थितीत आहे, ही मूर्ती मोठ्या शिल्पकलेच्या रचनेचा भाग होता, असल्याचं सांगितलं जात आहे.चिचेन इत्झा नवव्या आणि १३व्या शतकात भरभराटीला आला आणि ७४० एकर (३०० हेक्टर) पेक्षा जास्त क्षेत्रात व्यापलेले आहे. या पुरातत्व स्थळाच्या मध्यभागी एक पिरॅमिड आहे, जो एल कॅस्टिलो (किल्ला) म्हणून ओळखला जातो, जो १०० फूट (३० मीटर) उंच आहे. या ठिकाणी अनेक मंदिरं आहेत, तसेच बॉल कोर्ट आणि एक खगोलीय वेधशाळा आहे.चिचेन इत्झा हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. गेल्या काही वर्षांपासून INAH नवीन व्हिझिटर्स सेंटर्स आणि संग्रहालये तसेच 'ट्रेन माया' म्हणून ओळखल्या जाणार्‍या नवीन रेल्वे मार्गाची निर्मिती करत आहे. रेल्वेच्या या बांधकामाजवळ पुरातत्व काम करताना ही मूर्ती सापडली. या बांधकाम कार्यादरम्यान इतर पुरातत्वीय शोधांचा खजिना सापडला आहे, ज्यात अंदाजे ६६० मानवी कब्र, १ दशलक्षाहून अधिक सिरॅमिक तुकडे, अनेक वास्तू संरचनांचे अवशेष आणि इतर अनेक कलाकृतींचा समावेश आहे.असे सांगितले जाते.