सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळेचे समूहगीत गायन स्पर्धेत घवघवीत यश
सावंतवाडी
१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सावंतवाडी नगरपरिषद, सावंतवाडी यांच्या वतीने देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत इयत्ता पहिली ते चौथीच्या गटात सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळेने प्रथम क्रमांक पटकावला.शाळेच्या विद्यार्थ्यांनी ‘जयोस्तुते’ हे देशभक्तीपर गीत प्रभावीपणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली. उत्कृष्ट सांघिक सादरीकरण, सुरेल गायन आणि भावपूर्ण अभिव्यक्तीच्या जोरावर शाळेच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला. या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळा ही ज्ञान, कला व क्रीडा विभागात सातत्याने अव्वल स्थानावर राहिली आहे. शिष्यवृत्ती परीक्षेतही यंदा शाळेने अनेक गुणवत्ताधारक विद्यार्थी घडवून आपल्या शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. त्यामुळे समूहगीत गायन स्पर्धेतील हे यश शाळेच्या शैक्षणिक व सांस्कृतिक वाटचालीतील आणखी एक मानाचा तुरा ठरला आहे.या यशाबद्दल संस्था अध्यक्ष शैलेश पई, सचिव डॉ. प्रसाद नार्वेकर, संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक श्री. सावंत सर तसेच सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे आणि समूहगीतासाठी मार्गदर्शन करणाऱ्या श्रीमती ज्योत्स्ना गुंजाळ यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
konkansamwad 
