कणकवली मतदारसंघात नितेश राणे यांची विजयी हॅट्रिक

कणकवली मतदारसंघात नितेश राणे यांची विजयी हॅट्रिक


कणकवली 

कणकवली मतदारसंघात उबाठाचे संदेश पारकर हे चांगली लढत देतील अशी अपेक्षा होती. परंतु सर्वच बुथवर मताधिक्य घेऊन नितेश राणे यांनी आपल्या विजयाची पताका बुलंद केली आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच आमदार नितेश राणे आघाडीवर राहिले. शेवटच्या बुथ पर्यंत तसेच टपाली मतदानामध्येही  राणे आघाडीवर राहिले आहेत.मतदारसंघात सलग तिसऱ्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी होऊन आमदार नितेश राणे यांनी "हॅट्रिक" साधली आहे. उबाठाचे प्रतिस्पर्धी उमेदवार संदेश पारकर यांचा त्यांनी ५६ हजारापेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला आहे. राणे यांच्या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष सुरू ठेवला आहे. शहर तसेच तालुक्यात ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी होत आहे.चार महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत कणकवली विधानसभा मतदारसंघातून माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना ४२ हजाराचे मताधिक्य मिळाले होते. तर आमदार नितेश राणे यांनी २४ व्या फेरी अखेरपर्यंत ५५ हजार ९२५ एवढे मताधिक्य घेतले आहे.मतमोजणीच्या नवव्या फेरीनंतर आमदार नितेश राणे ओम गणेश बंगल्याबाहेर पडले. त्यानंतर भाजप कार्यालयासमोर भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष सुरू ठेवला आहे. कणकवली शहरासह सर्व मतदारसंघात फटाक्यांची आतषबाजी केली जात आहे.