मातोश्री कला क्रीडा मंडळ आयोजित रेकॉर्ड डान्स स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद लहान गटात सई राऊळ तर मोठ्या गटात रॉनी जाधव प्रथम

मातोश्री कला क्रीडा मंडळ आयोजित रेकॉर्ड डान्स स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद  लहान गटात सई राऊळ तर मोठ्या गटात रॉनी जाधव प्रथम


वेंगुर्ला
     वेंगुर्ला दाभोली नाका येथे मातोश्री कला क्रीडा मंडळाच्या वतीने रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धा लहान गट व मोठा गट अशा दोन गटात पार पडली. या रेकॉर्ड स्पर्धेत लहान गटात प्रथम क्रमांक सई राऊळ तर मोठा गट् प्रथम क्रमांक रॉनी जाधव यांनी पटकावला. 
     स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे-  लहान गट प्रथम क्रमांक सई राऊळ, द्वितीय क्रमांक वैष्णवी मुणनकर, तृतीय क्रमांक निधी खडपकर आणि उत्तेजनार्थ १. दिशम परक, २. हर्षदा गावकर.. मोठा गट प्रथम क्रमांक रॉनी जाधव, द्वितीय क्रमांक दूर्वा पावसकर, तृतीय क्रमांक वृषिका नेरुळकर, उत्तेजनार्थ १.भास्कर संगळे २.युक्ती हळदणकर. स्पर्धेचे परीक्षण अंतरा रगजी, मयुरी माडकर, पुनम बोवलेकर यांनी केले