वेंगुर्ला येथील उपजिल्हा रूग्णालयासमोर नागरिकांचे निषेध आंदोलन.......वैद्यकीय अधिकाऱ्यांसमोर वाचला समस्यांचा पाढा

वेंगुर्ला येथील उपजिल्हा रूग्णालयासमोर नागरिकांचे निषेध आंदोलन.......वैद्यकीय अधिकाऱ्यांसमोर वाचला समस्यांचा पाढा

 

वेंगुर्ला


 

   वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालय येथे वैद्यकीय अधीक्षकांसह अनेक महत्त्वाची पदे रिक्त आहेत. तसेच रुग्णांना योग्य सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. वेळोवेळी निवेदने देऊनही शासनाने दुर्लक्ष केल्याने नागरिकांच्या शिष्टमंडळाने वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयासमोर शांततेत निषेध आंदोलन केले. दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सक श्रीपाद पाटील यांच्या सूचनेनंतर निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष इंगळे यांनी नागरिकांच्या शिष्टमंडळाशी सुमारे १ तास चर्चा करून सर्व मागण्यांची पूर्तता करण्यात येईल असे आश्वासनही दिले. मार्च महिन्यामध्ये नागरिकांच्या शिष्टमंडळाने रुग्णालय प्रशासनाची भेट घेऊन विविध समस्या पूर्ण करण्याची मागणी केली होती. त्यानुसार १० एप्रिलपर्यंत पूर्तता न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला होता, त्यानुसार  नागरिकांनी निषेध आंदोलन छेडले. राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, ठाकरे शिवसेना उपतालुकाप्रमुख संजय गावडे, महेश वेंगुर्लेकर, शिवाजी गावडे, राजन साळगावकर, प्रताप गावस्कर, संतोष पेडणेकर, सिद्धी पेडणेकर, वाल्मिकी कुबल, शरद मेस्त्री, सुहास मांजरेकर, संजय पराडकर, किरण खानोलकर, भाऊ आरोलकर, सुहास तांडेल, अमित कुबल, भालचंद्र भोगटे, उमेश वेंगुर्लेकर, सचिन शिरोडकर, आकांक्षा परब आदी उपस्थित होते. आंदोलनास वेंगुर्ले तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष विभा खानोलकर यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. या निषेध आंदोलन दरम्यान संजय गावडे यांनी प्रशासकीय अधिकारी (मंत्रालय) प्रभाकर आरावंदेकर यांच्याशी संपर्क साधून रुग्णालयातील समस्या, आवश्यक सुविधा याबाबत माहिती दिली. याबाबत प्रस्ताव प्राप्त झाल्यास त्यांची पूर्तता करून वेंगुर्लेवासीयांना न्याय देऊ असे आश्वासन त्यांनी नागरिकांच्या शिष्टमंडळांना दिले. तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा केल्यानंतर निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुबोध इंगळे यांनी वेंगुर्ले रुग्णालय येथे भेट दिली. त्यानंतर नागरिकांच्या शिष्टमंडळासह वैद्यकीय अधिकाऱ्यांसमवेत सुमारे १ तास बैठक झाली. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या अनुषंगाने पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा रुग्णालय येथे पोलिस, होमगार्ड बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधीक्षक, शल्यचिकित्स भूलतज्ञ, भिशक, बालरोगतज्ञ, सहा.अधीक्षक, वरिष्ठ लिपिक, शिपाई, व्रण उपचारक पदे त्वरित भरावीत, सोनोग्राफी मशिनरी उपलब्ध व्हावेत, १०२ रुग्णवाहिका उपलब्ध करावी, चिकित्सा इन्स्ट्रुमेंट, डायलिसिस आदी मागण्या शिष्टमंडळाने केल्या.