दाभोली शाळेत बक्षीस वितरण व सांस्कृतिक सोहळा संपन्न....प्रा. डॉ. श्रीधर पेडणेकर यांचा विशेष सन्मान

दाभोली शाळेत बक्षीस वितरण व सांस्कृतिक सोहळा संपन्न....प्रा. डॉ. श्रीधर पेडणेकर यांचा विशेष सन्मान

वेंगुर्ले

    जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, दाभोली नं. १ येथे 'शारदोत्सव २०२६' निमित्त आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा प्रा. डॉ. श्रीधर पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि पालक-ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने सोहळ्याचा शुभारंभ झाला असून, यावेळी जिल्हा परिषद सदस्य विजय नाईक, पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर, माजी पंचायत समिती सदस्य समाधान बांदवलकर, पंचायत समिती सदस्य शितल राऊत, उपसरपंच कृष्णा बांदवलकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा योगिता गोलतकर, ग्रामविकास अधिकारी कृष्णा पेडणेकर आणि शिक्षणतज्ज्ञ केतन प्रभू खानोलकर आदी प्रमुख पाहुणे व्यासपीठावर उपस्थित होते. सोहळ्याच्या पहिल्या सत्रात विविध शैक्षणिक, क्रीडा व सहशालेय उपक्रमांत चमकदार कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले, तर सायंकाळच्या सत्रात विद्यार्थ्यांनी गायन, नृत्य आणि विविध कलाप्रकारांतून आपल्या सुप्त गुणांचे बहारदार सादरीकरण करत उपस्थितांची दाद मिळवली; विशेषतः विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पारंपरिक दशावतारी नाट्यप्रयोगाने संपूर्ण रसिकांची मने जिंकली. याच कार्यक्रमात शाळेच्या वतीने अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीधर पेडणेकर यांचा माजी पंचायत समिती सदस्य समाधान बांदवलकर यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला आणि संपूर्ण सोहळा अत्यंत आनंददायी व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.